तळेगाव स्टेशन:
निगडे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता भांगरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच रामदास चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे ,मीरा भांगरे ,महेश करपे ,सिताराम ठाकर, भाऊ थरकुडे, निलेश भागवत, पोलीस पाटील संतोष भागवत,आदिनाथ शिंदे,पद्मा भागवत, योगिता शेजवळ
ग्रामसेवक शशिकिरण जाधव ,ग्रामपंचायत कर्मचारी संजय भागवत, सहादु ठाकर, तसेच आजी माजी सरपंच, चेअरमन,सदस्य,व ग्रामस्थ उपस्थित होते .
सरपंच सविता भांगरे म्हणाल्या,” स्वातंत्र्यपूर्व लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.आजही आपल्या रक्षणासाठी लढणाऱ्या सीमेवरील जवानांचा, शेतात राबणा-या बळीराजाला, सुरक्षारक्षक पोलीस बांधवांचा आणि कोरोना लढ्यात लढणा-या आरोग्य यंत्रणेचा आदर केला पाहिजे.

error: Content is protected !!