लोणावळा :ज्ञानगंगा फाउंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट कामशेत येथील मुख्य ज्ञानगंगा संगणक प्रशिक्षण केंद्र अंतर्गत लोणावळा येथे शाखा नं ४ चे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी लोणावळा नगरपरिषद नगराध्यक्ष सुरेखा जाधव व श्री अभिजीत गरुड यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. याप्रसंगी ज्ञानगंगा फाऊंडेशनचे दशरथ पेठकर, निलेश कदम, नथुभाऊ आंद्रे, विजय शिर्के, सौरभ कदम, प्रीती कदम, दीपक कुंभार, अनुजा गरुड, प्रियांका पाटील, दिव्या गरुड, हुदा बंगाली, नुदरत पटेल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आत्ता आपण D. C. Ed कोर्स विध्यार्थ्यांना देणार आहोत. सवलती च्या दरात रेजिस्ट्रेशन फी घेतली जाणार आहे.ग्रामीण भागातील विध्यार्थी शिकला पाहिजे हा या मागचा मुळ हेतू आहे..
कायक्रमाचे सूत्रसंचालन संकेत पेटकर यांनी केले. समारंभाचे आयोजन ज्ञानगंगा संगणक प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका कु. अनुजा गरुड, प्रियांका पाटील, हुदा बंगाली यांनी केले होते.

error: Content is protected !!