टाकवे बुद्रुक:
कलाकारांचे आयुष्य कलेला वाहिलेले असते. तहान भूक हरपून तो कलेचा छंद जोपासतो.आयुष्यभराची कमाई म्हण्जे कलेतून जोडलेली माणसं. माऊ येथील कै.बनाजी केशव शिंदे रा. माऊ-टाकवे बुद्रुक एक असेच हरहुन्नरी कलाकार.
समग्र पंचक्रोशीत भारुडात काम करणारा एक कलावंत अशी त्यांची ओळख. हा त्यांच्या कर्तृत्वाचा आदर आणि मान-सन्मान.ते भारुडात एक नंबरचे काम करायचे.भारूड लोककले शिवाय या पंचक्रोशीत करमणुकीचे कोणतेच साधन नव्हते. अशा कालखंडात सासरे जावई या कलाकारांची जोडी प्रसिद्ध होती.
ते म्हणजे गोपाळ जयतु जगताप पाटील आणि बनाजी केशव शिंदे पाटील.
बनाजी शिंदे यांनी गरिबीत अत्यंत हलाखीचे कष्टाने दिवस काढले. आता त्यांचा मुलगा गणेश बनाजी शिंदे कुठेतरी हाताशी आला. आणि गरिबीचे ते दिवस सरत चालले होते.आता सुखाने खायचे दिवस आले तर ते अचानक आजारी पडले .
त्यांचा एक हात ऑपरेशनद्वारे काढण्यात आला.कष्ट करणारा हात नसल्याने ते पूर्ण खचून गेले मनाने खचले असताना एवढ्या लहान वयात त्यांच्या मुलांनी त्यांना व कुटुंबीयांना धीर दिला.
त्यांच्या पश्चात पत्नी -लिलाबाई बनाजी शिंदे,मुलगा -गणेश बनाजी शिंदे,मुलगी- पूनम विष्णू जांभूळकर टाकवे मुलगी-विद्या दीपक शेळके तळेगाव , मुलगी-संध्या सागर लष्करी वडेश्वर, बहीण-गंगुबाई गुलाब लष्करी भाऊ-सोपान केशव शिंदे,भाऊ-एकनाथ केशव शिंदे भाऊ-बाळू केशव शिंदे असा यांचा परिवार आहे.

error: Content is protected !!