टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ भागात ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या विना साधेपणाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. टाकवे बुद्रुक मधील तलाठी ऑफिस या ठिकाणी टाकवे गावचे पोलीस पाटील अतुल असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन महादू गुणाट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी टाकवे गावचे प्रथम नागरिक सरपंच भूषण आसवले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी जमीन देणगीदार संतोष असवले यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे ध्वजवंदन करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले यांच्या हस्ते, बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल या ठिकाणी टाकवे गावातील सामाजिक कार्यकर्ते सहादू गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी शैलेश साठे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
घोणशेत ग्रुप ग्राम पंचायत घोणशेतचे सरपंच अंकुश खरमारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी या ठिकाणी मच्छिंद्र कचरे यांच्या हस्ते,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाऊंड याठिकाणी उपसरपंच मनीषा राक्षे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत भोयरे याठिकाणी सरपंच बळीराम भोईरकर यांच्या हस्ते,माध्यमिक शाळा याठिकाणी दहावी मध्ये प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थीनी वैष्णवी संजय भोईरकर यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे या ठिकाणी शालेय समिती अध्यक्ष गोरख जांभूळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत खांडी याठिकाणी सरपंच आनंता पावशे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडी याठिकाणी उपसरपंच सुकन्या मारुती आंबेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत वडेश्वर याठिकाणी छाया रविंद्र हेमाडे सरपंच यांच्या हस्ते,कुसवलीत ग्रुप ग्रामपंचायत सरपंच चंद्रभागा बाळासाहेब दाते यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले.क
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळे या ठिकाणी सरपंच मारुती खामकर यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी उपसरपंच तुळशीराम जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
इंगळुण येथे सरपंच सुनीता सुदाम सुपे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव बुद्रुक या ठिकाणी सरपंच रोहिणी राजेश कोकाटे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव बुद्रुक या ठिकाणी उपसरपंच शंकर चिंधू बोऱ्हाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
गावातील ट्रस्टचे अध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी, विविध संस्थेचे पदाधिकारी,पत्रकार, सर्व शाळेतील त्यांचे मुख्याध्यापक स्टाप, ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन आजी-माजी संचालक, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सर्व ठिकाणी ध्वजारोहण साधेपणाने साजरा करण्यात आले.

error: Content is protected !!