वडगाव मावळ:सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने सह्यादी विद्यालय मेटलवाडी सावळा मावळ येथे गरजू व होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.व दहावी च्या प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी चा सत्कार करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मावळ तालुक्याचे माजी उपसभापती शांताराम कदम जेष्ठ नेते सुनील चव्हाण युवा नेते देविदास गायकवाड बी एन भसे सर माजी सरपंच सदानंद टिळेकर दीपक मोईकर सनी ठिलेकर प्रमोद मोईकर गणेश आल्हाट अमित तांबे आदी जण उपस्थित होते
 सध्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र प्रचंड नुकसान झालेले आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत चालले आहे. म्हणून अकादमी व सुनील चव्हाण मित्र परिवार तसेच सदानंद टिळेकर मित्र परिवार आदी चा सहकार्य ने कार्यक्रम चे नियोजन करण्यात आले होते असे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख चेतन वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख चेतन वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते  सचिन शेडगे, सदानंद पिलाने, अश्विन दाभाडे,राजेंद्र सातपुतेआदी जण उपस्थित होते.
 या वेळी माजी उपसभापती शांताराम कदम व सुनील चव्हाण यांनी मनोगत केले, प्रस्तावना सचिन शेडगे , सूत्रसंचालन लष्मण शेलार संतोष गारे याने केले व आभार भांगरे सर यांनी मानले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक ,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!