तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये झालेल्या कोट्यावधी भ्रष्टाचाराची सुनावणी अंतिम आली आहे,या सुनावणीत पितळ उघडे होईल या भीतीने माझ्यावर राज्यपातळीवरून दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे,जनता माझ्या सोबत आहे. मी असल्या दबावाला भीक घालीत नाही,असा पलटवार मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केला.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार सुनिल शेळके यांनी निसर्गाची छेडछाड करून १० कोटींचा उत्खनन घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना आमदार सुनिल शेळके आणि भाजप नेतृत्वावर शरसंधान साधून भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले.
सर्व कायदेशीर परवानगीने चौदा वर्षापासून माझ्या व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायातून मिळणा-या उत्पन्नापोटी सरकारचे सर्व सेवा कर मी भरीत आहे.
कोणाताही व्यवसाय करताना रीतसर कायदेशीर परवानगी घेतल्या शिवाय व्यवसाय करता येईल का असा प्रतिप्रश्न त्यानी केला.
माजी खासदार किरीट सोमय्या यांना चुकीची माहिती देऊन येथे आणले आहे. ते माझ्या व्यवसायावर येणार आहे हे माहित असते तर त्यांच्या स्वागताला थांबून त्यांचा पूर्वाश्रमीचा कार्यकर्ता किती जणांचे पोट भरतो. हा व्यवसाय कसा करतो आणि यातून सामाजिक काम कसा करतो याची तपशीलवार माहिती दिली असती. मी त्यांना चहापाणी करू शकलो नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी लावला.
आमदार शेळके म्हणाले,” मी गेल्या चौदा वर्षापासून या व्यावसायात आहे. २००८ साली क्रशर व्यावसाय सुरू केला. त्यावेळी गट नं. १३६ मध्ये खाण पट्टा घेतला होता. २०१४ साली तो खाण पट्टा रद्द झाला. त्यानंतर तीन गटांमध्ये खाण पट्टा घेतला. याकरिता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्ड, महसुल विभाग, खणीकर्म विभाग, विज वितरण या सर्वांच्या परवानग्या घेतल्या आहेत. ह्या परवानग्या देताना गाव, रस्ते, धरणे या पासून किती अंतरावर ते देण्यात यावे, याची नियमावली आहे. कोणताही व्यावसाय करताना तो परवानग्या घेऊनच करावा लागतो.या सगळ्या परवानग्या घेतल्या आहे. ग्रामपंचायतीची ठराव,एनओसी घेतली आहे. आता
बेकायदेशीरपणे व्यावसाय करणे सोपे नाही.
मागील दिड वर्षापासून माझ्या जागांचे सातबारे, माझ्या व्यावसायाची माहिती, माझे कोणाशी लांगेबांधे आहेत का, मी कोठे जातो, काय करतो याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. मी तळेगाव व लोणावळा नगरपरिषदेमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली म्हणून माझ्यावर राज्यस्तरावरून दबाव टाकून प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी ह्या दबावाला बळी पडणार नाही. मी प्रामाणिकपणे मावळ तालुक्याच्या विकासासाठी काम करत आहे म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे. ज्या दिवशी चुकीचे काम करेल त्यादिवशी जनता व माझे कुटुंब मला जवळ करणार नाही. मी कोठेही दोन नंबरचे धंदे करत नाही की मटके चालू करून हप्ते गोळा करत नाही असा टोला त्यांनी दिड वर्षापुर्वीच्या कारभारावर हाणला.
आमदार शेळके पुढे म्हणाले,” तालुक्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात आहेत. दीड वर्षात दोन जिल्हा रूग्णालय,नदीपात्रावर पूल,राज्य महामार्गाला भरघोस निधी,या शिवाय पर्यटन वाढीसाठी निधी आणून तालुका सुजलाम सुजलाम करण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रलंबित असलेले पवनेचे आंद्रे चे पुनर्वसन,टाटा धरणग्रस्तांचे प्रश्न कामावर आपला भरोसा असून,कामामुळेच आपणाला जनतेने स्विकारले आहे.मी चूकीचे वागलो तर जनता मला घरी बसविण्या
आधी मी स्वत: पायउतार होइन असे सांगून विरोधकांनी खोट व चूकीचे आरोप करणे थांबवावे असे अवाहनही आमदार शेळके यांनी केले.

error: Content is protected !!