तळेगाव दाभाडे:
मावळातील आंबळे परिसरातील १० कोटी रूपयांच्या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली.माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके बेकायदेशीर उत्खनन करून निसर्गाचा -हास करीत असल्याचा घणाघाती आरोप करून सत्ताधारी आमदारांना पाठीशी घालीत आहे असा आक्षेप घेत आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आघाडी सरकारवर निशाणा साधला.शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी शंभर कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा सोमय्या यांनी गौप्यस्फोट केला.माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मावळातील गौणखनिज उत्खननाच्या बेकायदेशीर बाबींचा तपशील मांडला.बेकायेशीर उत्खननाची चौकशी करावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ व केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे या बाबत तक्रार दाखल केल्याचे सांगीतले.
माजी मंत्री बाळा भेगडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. आमदार सुनिल शेळके यांनी गौण खनिज उत्खननाची दोन गटात परवानगी असून इतर आठ गट नंबर मध्ये बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचे सांगितले. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या परिसराची पाहणी करून मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना या अनुषंगाने निवेदन दिले. मावळातील बेकायदेशीर उत्खननातून निसर्ग साधनसंपत्तीचा मोठे नुकसान झाले याकडे जिल्हाधिकारी का कानाडोळा करीत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले,” उत्खननातून
निसर्ग प्रकृती छेडछाड होऊन मोठे नुकसान झाले आहे. धरणापासून शंभर फुटावर आमदाराचा उत्खनन आहे.
सत्ताधारीच अशा प्रकारे उत्खनन करत आहे कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे. असे सांगून सोमय्या म्हणाले,”
या परिसराची पाहणी केली असता, गौणखनिज उत्खननाची परवानगी घेतलेल्या ठिकाणी मोठा खड्ड्यात पाणी साचले आहे. तर आठ ठिकाणी काम सुरू आहे. दगड,खडी, मशीन्स पडले आहेत. हे प्रकरण घेऊन थेट वर पर्यत घेऊन जाणार. धरणाला धोका झाला तरी जीव धोक्यात येईल. पैशासाठी निसर्गाची छेडछाड बंद करा. आमदारांनी गैरव्यवहार थांबवले पाहिजे.
याच पत्रकार परिषदेत माजी खासदार सोमय्या यांनी
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी शंभर कोटी डापले असल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त त्यांनी कोरोना उपाययोजनेत सरकार कमकुवत असल्याचे सांगून सरकारच्या शिक्षणा बाबतच्या दरसोड वृत्तीची खिल्ली उडवली.

error: Content is protected !!