लोणावळा:
जलजीवन मिशन अंतर्गत ६ कोटी ९० लक्ष रुपये च्या डोंगरगाव-कुसगाव वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन स्थानिक माता-भगिनींच्या हस्ते करण्यात आले. या योजनेमुळे स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी योजनेमुळे डोंगरगाव, कुसगाव, डोंगरवाडी, केवरे वसाहत, भैरवनाथ नगर, गुरव वस्ती या भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या संकटाचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागला. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी व माझ्या माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवा हा आमदार सुनिल शेळके यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला.
आमदार सुनिल शेळके यांनी या योजनेसाठी सतत पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळाले असून लवकरच प्रत्यक्षात कामाची सुरुवात देखील होणार आहे. व या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
पाणी योजनेसाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी श्रीमती इंदुबाई गाडे, श्रीमती सीताबाई ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्या गंगाताई कोकरे, शंकर गाडे, अनंता गाडे यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.
यावेळी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका सुनील शेळके, जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई काशीकर, पंचायत समिती सदस्या राजश्रीताई राऊत, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णाताई राऊत, लोणावळा महिला अध्यक्षा मंजुश्रीताई वाघ, संजय गांधी समिती सदस्या ज्योती मालपोटे, नगरसेविका संगिता शेळके, सरपंच अश्विनी गुंड, सरपंच सुनिल येवले, उपसरपंच स्मिता खोले, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब गुंड, गंगाताई कोकरे, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी व स्थानिक भगिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!