
आपल्या कर्तुत्वाने आणि कार्य कुशलतेने गावाचं नाव महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात पोहचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे भोयरे गावचे विद्यमान सरपंच श्री. बळीराम राणू भोईरकर!
वडिलांनी जवळपास चाळीस वर्षे गावचा कारभार पाहिला. गावाच्या विकासात मोलाचा वाटा या पिता – पुत्रांचा आहे, असेच म्हणावे लागेल.
गावामध्ये शाळा आणि कॉलेज आणताना वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत बळीराम सरपंचांनी सुद्धा गावाला आदर्श त्वाच्या उंबरठयावर नेऊन ठेवले.
आपला उद्योग सांभाळत गाव कारभार हाकताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच निकराने उभे राहून सरपंच काम करत असतात. हे सगळं करताना कुटुंबाकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. एकत्र कुटुंबात बाजीराव सरांसारखा समंजस मोठा भाऊ लाभल्याने खूप चांगली सपोर्ट सिस्टीम लाभली आहे..
सरपंचांची ध्येय खूप चांगली आहेत. त्यांची सर्वच स्वप्नं पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! (शब्दांकन- तुळशीराम जाधव उपसरपंच कशाळ)
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



