वडगाव मावळ:
टोकियो येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धतील प्रथम सुवर्ण पदक चिराग संतोष(बापू) वाघवले या वेटलिप्टर प्लेअरने मिळवले. चिरागच्या या यशाचे जोरदार स्वागत होत आहे.
वेटलिफ्टींग या खेळामध्ये बुद्धी आणि ताकद याचा मेळ साधून अचुक वजन उचलावे लागते. तसे पाहता या खेळाला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत या क्षेत्रातील क्रिडाप्रेमींना आहे. अनेकांनी ही खंत बोलून दाखवली.
प्रसिद्धी पासून दूर असलेल्या खेळाचा वारसा जपला पुणे जिल्हातील मावळ तालुक्याने जोपसला. चिराग वाघवले वडगाव मावळचाच. या गावाने गेले अनेक वर्षे वडगाव मावळ मध्ये वेटलिफ्टींगचा वारसा जोपसला आहे. खेळामध्ये अनेक खेळाडू निर्माण होत गेले त्याच श्रेय जाते येथे असलेल्या व्यायाम शाळांना.
सह्याद्री जिमखाना, महाराष्ट्र जिम , दुबेज गुरुकुल ,फ्रेंड्स जिम या व्यायाम शाळांमधून अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले. ते येथील प्रशिक्षकांमुळे. त्याचेच फलित म्हणजे २००९ साली झालेल्या पॉवर लिफ्टिंग पश्चिम महाराष्ट्र स्पर्धेत हेमंत काकडे याने सुवर्ण पदक व राष्ट्रीय वेट लिफ्टिंग रोहित वाघवले यांनी प्रथम सुवर्ण पदक मिळवून दिले .
त्यानंतर वडगाव मावळ येथील व्यायामशाळामधील राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी पदके जिंकून आणली. त्याचे श्रेय जाते अर्थात येथील प्रशिक्षकांना. आज दिनांक ११ऑगस्ट २०२१ रोजी पतियाळा(पंजाब ) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कु. चिराग संतोष(बापू) वाघवले यांनी सुवर्ण पदक मिळवले.
ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी प्रशिक्षक श्री संतोष (बापू) वाघवले यांचे प्रशिक्षण लाभले. तसेच सह्याद्री व्यायमशाळेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब चव्हाण व सचिव श्री. सुनील चव्हाण , प्रविण चव्हाण व रविंद्र काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. असेच अनेक खेळाडूंनी पदके मिळवावित व अनेक खेळाडू निर्माण व्हावेत ,अशी अपेक्षा येथील क्रिडा प्रेमी,प्रशिक्षक व खेळाडूंनी व्यक्त केली.

error: Content is protected !!