वडगाव मावळ:
शहरातील वृक्षसंवर्धनासाठी वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वखर्चातून नागरिकांसाठी दिलेल्या एक हजार झाडे वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी वडगाव नगरपंचायत नेहमी पुढाकार घेत आहे. नगराध्यक्षांनी नागरिकांसाठी मोफत झाडे उपलब्ध करुन एक चांगला उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना पर्यावरण रक्षणाची साद घातली आहे.
मावळचे आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व सवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे,राष्ट्रवादीचे नेते मंगेश ढोरे, वडगाव नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!