टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी मारूती असवले यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी त्यांची नियुक्ती केली. आमदार सुनिल शेळके व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे विठ्ठलराव शिंदे,कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव,महिलाध्यक्ष सुर्वणा राऊत, पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मण बालगुडे, काळुराम मालपोटे, तुकाराम असवले, महादू कालेकर,नारायण ठाकर, रघुनाथ मालपोटे आदि उपस्थित होते.
मारूती असवले म्हणाले,” राष्ट्रवादीचे संघटन वाढीसाठी प्रयत्नशील राहील. पक्षाचे ध्येय धोरणे गावपातळीवर पोहचवून संघटना बळकट करणार. पक्षाच्या मार्फत शासकीय योजनांवर पोहचविण्यासाठी पुढाकार घेणार.

error: Content is protected !!