
वडगाव मावळ: गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ने निषेध आंदोलन केले. बहुत हुई महंगाई की मार ,अब की बार मोदी सरकार”! असे जनतेला आश्वासन देत भाजपा सत्तेत आली खरी.पण भाजपानं आश्वासनावर पाणी सोडले. गेल्या सात वर्षांत गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली. कोरोनाच्या संकटात वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरांमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले. याच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध अंदोलन वडगाव तहसिल कार्यालयावर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर व आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे कार्यध्येक्ष दिपक हुलावळे ,सुभाषराव जाधव, संजय गांधी निरधार अनुदान योजनेचे अध्यक्ष तसेच रा.काँ.संघटनमंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

