शिवली:- येथे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने कै. निखील बिराजदार विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे गरजू व होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
 
सध्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र प्रचंड नुकसान झालेले आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत चालले आहे. म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना हि मदत करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख चेतन वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
 
यावेळी प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख चेतन वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते  सचिन शेडगे, सहदेव केदारी, अंकुश काटकर, अश्विन दाभाडे, नवनाथ केदारी, किरण ढोरे, मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव, संतोष जगदाळे, ईश्वर ढगे, वशिष्ठ गटकुळ, किसन मांजरे, अतिश थोरात, बाळु ठोंबरे, कल्पना पवार, संजय पाटील आदी जण उपस्थित होते.
 
मनोगत किरण ढोरे यांनी, प्रस्तावना नवनाथ केदारी, सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार आणि आभार अतिष थोरात यांनी मानले.

error: Content is protected !!