वडगाव मावळ:
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अवैध गावठी दारू विक्री बंद करावी अशी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
वडगाव मावळ पोलिस स्टेशनला शहरातील रेल्वे स्टेशन या परिसरातील अवैध गावठी दारू विक्री बंद करणेबाबत निवेदन देण्यात आले.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक चार मधील रेल्वे स्टेशन लगत गावठी दारू विक्री गेली वर्षभरापासून चालू आहे. त्यामुळे सदर परिसरातील महिलांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दारू पिणाऱ्या व्यक्ती रस्त्यावरच वादविवाद करून शिवीगाळ करत असतात.
तसेच रेल्वे लाईन ओलांडून जात असताना मोठा अपघात घडू शकतो. त्याचप्रमाणे सदर प्रभागातील नागरिकांनी ती दारू विक्री बंद करावी यासाठी प्रतिष्ठानच्या महिलांनी सह्यांचे निवेदन वडगाव पोलिस स्टेशन यांना दिले.
तरी लोकांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा विचार करता सदर दारू विक्री बंद करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी व दारू विक्री पुन्हा चालू न होण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, संचालिका मीनाक्षी ढोरे, शर्मिला ढोरे, कविता नखाते, प्रतिक्षा गट, ज्योती सुगराळे, नयना भोसले, कांचन ढमाले, स्वाती चव्हाण, जयश्री जेरातागी, शितल ढोरे, जान्हवी ढोरे, सुषमा जाजू आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!