कामशेत: खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतींच्याउपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच निलेश गायखे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली.
उपसरपंच पदाच्या
निवडणूकी साठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रूपेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंच पदासाठी दाभाडे.यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक संपत खोमणे यांनी दाभाडे यांची निवड घोषित केली.
महाविकास आघाडीचे निलेश गायखे ,परेश बरदाडे,दत्ता शिंदे,अभिजित शिनगारे,दत्ता रावते,विमल पडवकर,अनिता गायखे,शिल्पा दौंडे,कविता काळे,अंजना मुथा,वैशाली इंगवले हे सदस्य बैठकीत सहभागी होते.
ज्येष्ठ नेते आनंद टाटिया,माजी उपसरपंच तानाजी दाभाडे, डाॅ.विकेश मुथा,गजानन शिंदे,सुधीर वीर,सुभाष रायसोनी, विजय दौंडे ,अरविंद ओसवाल, नरेश बेदमुथा, संजय पडवकर, संतोष राक्षे ,सुभाष रायसोनी यांच्या
उपस्थितीत नवनिर्वाचित उपसरपंच निलेश दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला.
उपसरपंच निलेश दाभाडे म्हणाले,” महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवीन. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

error: Content is protected !!