
पिंपरी: गरजू मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धुणेभांडी करणाऱ्या महिलांच्या मुलांना,घरकाम करणाऱ्या,गवंडी काम करणाऱ्या २७ गरजू मुलांना व मुलींना मोबॉईल वह्या,पेन,खोडरबर,पेन्सिलचे वाटप करण्यात आले. यातील काही मुलांना त्यांच्या घरी जाऊन या शैक्षणिक साधनाचे वाटप केले गेले.चिंचवडेनगर येथील धुणेभांडी करणाऱ्या एका महिलेच्या मुलाचा अॉनलाईन अभ्यास करताना मोबॉईल बिघडला होता.त्याने आम्हाला मोबॉईल मिळेल का अशी विचारणा केली असता आमच्या दानशुर सभासद श्रीमती रुपाली नामदे यांनी एक मोबॉईल उपलब्ध करुन चिं.ओम कुचेकर याला स्वतः दिला. वह्यांसाठी गुणवंत कामगार सुभाष चव्हाण,अहमदनगर येथील संदीप कुलट, जगताप मेजर, मोहरे मेजर, पप्पु जगताप मेजर, अमोल सोनवणे यांनी मदत केली.डॉ मोहन गायकवाड,मनोहर कड,दत्तात्रय देवकर रंजना जोशी श्वेता गायकवाड यांनी वाटप केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



