वडगाव मावळ: वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्जन्यमानावरही परिणाम झाला आहे. पाऊस टप्प्याटप्प्याने होत आहे. याचा विपरीत परिणाम पर्यावरण आणि शेतीवर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून वृक्षारोपण व त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे संवर्धन करावे,’ असे आवाहन आई एकविरा युवा विकास प्रतिष्ठान,दहिवली यांच्या सदस्यांनी केले.
प्रतिष्ठानच्या वतीने मागील वर्षी दहिवली गावा मध्ये १००० वृक्ष जगवण्याचा संकल्प करण्यात आला त्या उपक्रमा अंतर्गत मागील वर्षी ४० वृक्ष लागवड करण्यात आली वृक्षासाठी कठीण काळ हा उन्हाळा असतो त्या उन्हाळा मध्ये वेळेवर झाडांना पाणी घालण्याचे काम करण्यात आले ह्यावर्षी देखील प्रतिष्ठानच्या वतीने ३४ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले
गावची खरी सुंदरता ही झाडांच्या सहवासात आहे हे प्रामुख्याने प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगण्यात आले
यावेळी प्रसंगी वेहेरगाव-दहिवलीचे माजी सरपंच सचिन येवले,भाजप प्रसिध्दी प्रमुख मावळ सागर शिंदे,संजय येवले,सोमनाथ येवले,नितीन येवले,प्रदीप येवले,मुकुंद येवले,सर्वेश येवले,भूषण पडवळ,यश पडवळ,योगेश पडवळ उपस्थित होते.

error: Content is protected !!