
मावळमित्र न्यूज:
तासनतास स्मार्टफोन मध्ये डोक खुपसून बसलेली मंडळी, जागोजागी दिसतील. तरूणाचं, मुलाचं बागडणं हरपून गेलं अशी ओरड सुरू झाली, काही अंशी हे खरं असलं तरी सोशल मीडियातून लोकसंवाद साधता येतोच,या शिवाय मदतीला धावून जाता येते. ही मदत एखाद्याच्या आयुष्याचा ट्रर्निग पाॅईट ठरू शकतो. कोरोनाच्या संकटात सोशल मीडियाच्या मदतीने अनेकांना प्लाझ्मा मिळवून देणे सोयीच ठरलं.
प्रसंग सुखाचा असो की, दु:खाचा त्या घटनेची माहिती काही मिनिटांत आप्तस्वकीय पर्यंत पोचायला सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरू लागले आहे. काम कोणतेही असो,ते ईमानेइतबारे केली की,त्याची दखल घेतली जाते.
सोशल मीडियाच्या मदतीने जनसंपर्क वाढवून सतत अपडेट असलेला कशाळचा मंगेश मारूती जाधव. त्यातला एक,आपल्या नेतृत्वावर प्रचंड निष्ठा असलेला मंगेश सोशल मीडियातून सातत्याने विधायक बाबींना फाॅरवड करीत असतो. मनाला उभारी देणारे सुविचार,वाढदिवसाच्या शुभेच्छा,शासनाचे निर्णय,आरोग्य विभागाने दिलेल्या सुचना,पक्ष नेतृत्वाने केलेले उपक्रम,पक्षाची ध्येय धोरणे असो की,विरोधकांच्या टीकेचे उत्तर मंगेश या कामात अग्रेसर आहेच.
आज हे सगळ मांडण्याचे कारण आज त्याचा वाढदिवस आहे.मावळमित्र परिवाराने समाजात सकारात्मक असलेल्या अवलिया वाढदिवशी प्रेझेंट करून शुभेच्छा देत त्याच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून हा सगळा लेखन प्रपंच.सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांच्या मदतीला धावणारा आवलिया ‘मंगेश मारुती जाधव”.
याचा जन्म कशाळ या गावातील शेतकरी कुटुंबात झाला.घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती.घर हे शेती या व्यवसायावर जाधव कुटूबिय अवलंबुन.चार भावंडे आणि आई वडिल असा परिवार. मंगेशचे प्राथमिक शिक्षण कशाळ येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पितृछञ हरपल्याने अतिशय दुखाचा डोंगर या परिवारावर कोसळला होता.
आई लक्ष्मीबाई अतिशय धाडसी .तिने हे सर्व दु:ख सावरत मंगेशला चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले. तिच्या नावात लक्ष्मी असल्याने ती कष्टाला कधीच डगमगली नाही. मंगेश शेती वाडी आणि जमिनजुमनीने भर भक्कम. शेतीतून मिळणा-या पिकांवर जाधव कुटूंबाची गुजराण होतीच. सोबत दही दुधाचा रतीब होताच. मंगेशचे बारावीपर्यंतचे शिक्षण न्यु इंग्लीश स्कुल व ज्यु.काॕलेज भोयरे या ठिकाणी झाले.
वडगाव मावळ येथे पदवी पर्यत शिक्षण झाले. मंगेश एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होता. लोकनेते माजी केंद्रीय कृषीमंञी, खासदार मा.शरदचंद्रजी पवार साहेब व उपमुख्यमंञी मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या विचारांचा प्रभाव मंगेश वर विद्यार्थी दशेतच होता.
मंगेशने समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मंगेशला विद्यार्थी संघटनेबरोबर सोशल मिडिया काम करण्याची संधी मिळाली.
मंगेशने अतिशय नेटाने ही जबाबदारी सांभाळली पवार साहेबांचे विचार सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले.कोरोनाच्या काळात संपुर्ण माहिती लोकांपर्यंत पोहचवुन या कठीण काळात काही गरजु लोकांना बेड व व्हेंटिलेटर मंगेश सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळवुन देऊ शकला,त्यामुळे त्याचे सर्वच थरातुन कौतुक झाले.
शासनाच्या सर्व शासकीय योजनांची माहिती मंगेश नेहमी सर्वांना पाठवित असतो त्यातुन अनेक गरजुनी शासकीय योजनांचा लाभ मिळवला. सोशल मिडिया व आपल्या समाजसेवेच्या आवडीमुळे लोकांच्या मदतीला नेहमी धावुन येणाऱ्या ‘मंगेश मारुती जाधव’ला वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा…
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


