कामशेत:
डाॅक्टर आणि पेशंट्स याचं नात विश्वासाचे असते. डाॅक्टरला पेशंट आपले दुखणे, सुख दु:ख सांगतो. डाॅक्टरही रूग्णांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करीत असतो. डाॅक्टर आणि पेशंटचे नात इतक घट्ट होते की, ऐकामेकाच्या सुखदु:खाच्या गोष्टी ते शेअर करतात. आज डाॅक्टर डे या निमित्त गणेश वाळुंजकर कुटुंबिय आणि समस्त नातेवाईक परिवाराने डाॅ. प्रशांत टाटिया यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इंद्रायणी हाॅस्पिटल मध्ये जाऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.
डॉ.प्रशांत टाटीया आंदर मावळ, नाणे मावळ,पवन मावळातील अनेकांचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णांना अतिशय चांगल्याप्रकारे वैद्यकीय सेवा दिली. गरजू रुग्णांना अगदी मोफत वैद्यकीय सेवा दिली. दुखणे कोणतेही असो त्यावर डाॅ.प्रशांत टाटिया यांचे ओपिनियन घेतल्या शिवाय वाळुंजकर परिवारातील सगळे नातेवाईक कोणतेच निर्णय घेत नाहीत.आपल्या डाॅक्टरांची कृतज्ञता व्यक्त करायला डाॅक्टर डे सारखा दुसरा दिवसच नाही,हे ओळखून हा छोटेखानी सभारंभ पार पडला.
कामशेत नगरीचे माजी सरपंच श्री.तानाजी दाभाडे.करूंज गावचे माजी सरपंच शंकरराव लोखंडे . मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.गणेश वाळुंजकर, श्री.जिवाजी लालगुडे, श्री.नामदेव शिंदे, श्री.लालामहाराज वाळुंजकर, श्री.मारूती म्हस्के, श्री.प्रकाश वाळुंजकर, श्री सुभाष म्हस्के, श्री.नितीन म्हस्के, श्री.मुकूंद कंक यांच्या उपस्थितीत प्रशांत टाटीया यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर म्हणाले,” कोरोना संकटाच्या काळात आमच्या नातेवाईकात कोणालाही कोरोनाची काहीही लक्षणे जाणवली तरी,आम्ही मनाने खचून जायचो,डाॅ. प्रशांत टाटिया यांनी धीर दिला,मनोबल वाढवले. योग्य उपचाराने कित्येकांना बरे करून घरी पाठवले.त्याच्या बद्दल असलेल्या आदरातून त्याचा सन्मान घडवून आणला.

error: Content is protected !!