मावळमित्र ( तुळशीराम जाधव):
“परिस्थिती फार गंभीर आहे..तो सिरियस आहे.. गेली सहा दिवस..त्याला व्हेंटिलेटर वर ठेवलं… कृत्रिम श्वास कमी करून…थोडा थोडा नैसर्गिक श्वास देण्याचा ठरवलं..तसा प्रयत्न करण्याचे निश्चित झालं.
आणि त्यास त्याचाही प्रतिसादही चांगला मिळत होता. पण… अचानक मेंदूचा हृदयावर नियंत्रण ठेवणारा भाग काम करेनासा झाला … हृदयावर त्याचा दबाव आला. काही क्षणांचा विलंब… लगेच हृदयावर मोठा स्ट्रोक पडला… आणि हृदय बंद पडलं…
बऱ्याचदा अशा केसेस मध्ये अशी घटना घडते. आणि पेशंट दगावतात. आम्ही अजूनही पेशंट वाचवण्यासाठी आमचं सर्वस्व देतोय परंतु शेवटी वरच्याच्या हातात आहे सगळं.. डाॅक्टर आणि गावक-यांचे हे संभाषण.
●Let’s try for an hour. Please Wait.”
अथर्व हॉस्पीटलचे डॉ. माने सर आयसीयुच्या केबिन मध्ये बोलत होते. धीरगंभीर होऊन आम्ही ऐकत होतो. शेजारीच गेली आठवडाभर भावाचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असणारा. जिवाचं रान करणारा मुरलीचा भाऊ संभाजी आतल्या आत तुटत होता.
त्याला हे सगळं ऐकताना बसणारा धक्का अतिशय वेदनेने अनुभवत होतो. त्याला धीर कसा द्यायचा, हा यक्ष प्रश्न होता, काहीच सुचत नव्हतं.
मन घट्ट केले,खंबीर मनाने संभाजीचा हात हातात घेत त्याला आयसीयु मधून बाहेर घेऊन आलो. बाहेर मोठ्या भावाचा मुलगा, विनायक हा नजर रोखून बसलेला होता.
संभाजीचा चेहरा त्याने नेमका हेरला आणि त्याचाही धीर सुटला.
●आशेचा किरण
त्याला घेऊन खाली पार्किंग मध्ये त्यांची समज काढताना जीवाची घालमेल होती.ह. भ. प. काळूराम महाराज जगताप सोबत होतेच तेही खूप समजवण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न करीत होते.दुपारी तीनच्या सुमारास संभाजीचा फोन आला होता. “मुरली शुद्धीवर आलाय.” त्याला “आलोच लगेच.” आशेचा किरण जागवला.
आणि लगेचच बुवाला घेऊन हॉस्पीटलला जायला निघालो. पुण्याला जाताना संभाजीला भेटून पेशंटची विचारपूस करून पुढे जायचं, हे आधीच ठरलं होतं. त्यात संभाजीची पेशंट शुद्धीवर आल्याची बातमी ऐकून अधिक आनंद झाला होता.
आज पेशंटने खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता. दुपारी त्याचा मित्र पप्पू ( शंकर ), आणि अजून दोन चार मंडळी आयसीयु ला जाऊन आली. पेशंटने दिलेला रिस्पॉन्स बघून आज सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. घरीही सगळे आनंदी होते. पेशंट बरा होतोय, हे ऐकून घरी समाधान होत. भात लावणी लवकरात लवकर आटोपून घ्यावी, म्हणून सगळेजण कामाला लागले होते.
परंतू हा आनंद, हे समाधान परमेश्वराने जास्त काळ टिकवू दिले नाही. काळाने घाला घालून ऐन उमेदीतलं तारुण्य हिरावलं. आपलं कर्तुत्व दाखवताना अचानक पणे मुरलीला काळाच्या पडद्याआड जावा लागलं.मितभाषी, शांत स्वभाव असलेल्या मुरलीने पहिलवानी ताकदीचा कधीच गर्व केला नाही. मोठ्यांचा आदर राखायला मुरली कधीच कमी पडला नाही.
●मनाला चटका
मुरली जाताना मात्र मनाला चटका लावुन गेला.
हॉस्पिटल मध्ये अनेक जणांची अगदी तन मन धनाने मदत झाली. कितीही पैसा गेला तरी मुरलीला बरे करूनच घरी न्यायचे, हा घरच्यांनी अगदी पणच केलेला…परंतु ईश्वरी सत्तेपुढे कोणाचे काहीही चालत नाही, हे अगदी सिद्ध झाले.
हॉस्पिटलचा खर्च कमी करण्यासाठी आमदार सुनील अण्णा शेळके यांची आणि त्यांच्या सर्व टीमची खूप मदत झाली. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश मिळाले नाही. गावातीलच नाही तर अख्ख्या तालुक्यातील एक पहिलवान गेला. हळव्या मनाने आणि साश्रू नयनांनी साऱ्या पंचक्रोशीने निरोप दिला. निरोप देताना आठवणी मात्र कायम राहिल्या.
● न विसरणारे व्यक्तिमत्व
मुरली पहिलवान एक न विसरणारं व्यक्तिमत्व होतं. हे व्यक्तिमत्व आठवणींना सतत उजाळा देत राहील…! मावळ तालुक्याच्या लालमातीच्या आखाड्यात कुस्तीचा फड रंगवणारा मुरली पैलवान मावळ तालुक्याची शान होती. आई वडीलांच्या प्रेरणेने तो कुस्तीची लढत करायचा. त्याचे वडिलही पैलवानकीला दाद देणारे व्यक्तीमत्व. अनेक आखाड्यात मुरली पैलवाननी गावचे आणि तालुक्याचे नाव मोठे केले. त्याच्या कर्तबगारीच्या आठवणी चिरकाल मनात घर करून राहतील.

error: Content is protected !!