वडगाव मावळ:
महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद संघाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी मावळ तालुक्यातील कशाळ गावचे उपसरपंच तुळशीराम पोपट जाधव यांची निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी ग्राम संवाद संघाच्या माध्यमातून विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. या समस्या आणि त्यांचा कायदेशीर रित्या अभ्यास करणे गरजेचे असते.
मागील काही महिन्यातील जाधव यांचे काम पाहता त्यांनी अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. तरुणांशी संवाद, ग्राम स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, आरोग्य सर्वेक्षण, गावातील ग्रामस्थांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मन की बात, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक सबलीकरणासाठी विविध बचत गटांची स्थापना करून ग्राम संघाची स्थापना, विविध शासकीय योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या जॉब कार्ड काढण्यासाठी मॅजिक बस संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली.
जन धन खाते उघडण्यासाठी जनजागृती, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती, शिवार रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध उपाययोजना, मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विषयक वस्तूंचे वाटप, हँड इन हॅण्ड संस्थेच्या माध्यमातून आदिवासी वस्तीतील जल वितरण नलिका, गाव देवस्थान इनाम जमिनीची कायदेशीर लढाई अशा अनेक विषयांवर जाधव यांनी प्रकाश टाकला आहे.
या सगळ्या गोष्टींचा निकष काढत ग्राम संवाद संघाच्या निवड समितीने जाधव यांची पुणे जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. संघाचे अध्यक्ष अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे आणि जिल्हाध्यक्ष प्रियांका शेळके यांनी त्यांची निवड केली.
तुळशीराम जाधव म्हणाले,”
संघटनेची तत्वं आणि विचारसरणी सांभाळत ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी जीव ओतून काम करीन.

error: Content is protected !!