वडगांव मावळ:
मावळ तालुक्यातील सर्व शासकिय व निमशासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खावटी वाटप करण्यात यावे अशी मागणी युवा नेते देवाभाऊ गायकवाड यांनी केली आहे.
मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना मावळ तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी यांना खावटी वाटप करण्याबाबत दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गणेश धानिवले, हभप लक्ष्मण ठाकर महाराज, पोटोबा देवस्थानचे विश्वस्त अनंता कुडे, हभप वरघडे महाराज आदि उपस्थित होते. मावळ तालुक्यातील वडेश्वर, माळेगाव व कामशेत या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेत शिकणा-या विदयार्थीसाठी शासनाने अनुदान स्तरावर शाळा सुरू केली. असून त्यात
मावळ मधील अनेक गोर गरीब गरजु कुटुंबातील विदयार्थी शिक्षण घेतात.
त्यात त्यांना राहणे, खाणे व शिक्षण शासनामार्फत मोफत असते, परंतु कोरोनामुळे गेल्या २ वर्षापासून शाळा बंद असून त्यातील विदयार्थी हे घरी गेले, त्यांना शासन नियमाप्रमाणे येणारी खावटी मिळत नाही, शाळा बंद असो की सुरू असो त्यांना त्यांचा लाभ मिळालाच पाहीजे असा आग्रह देवा गायकवाड यांनी प्रशासनाकडे केला आहे.
या शाळेत शिकणा-या विदयार्थ्यांची खावटी त्यांना घरपोच त्या-त्या आश्रम शाळामार्फत जो विदयार्थी त्या शाळेत आहे, त्या सर्वेमार्फत त्यांची खावटी पोहोच
करावी. जेणे करून हे विद्यार्थी उपाशी राहणार नाही. त्याचा त्यांना लाभ मिळालाच पाहीजे याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
त्यासाठी रस्त्यावर याव लागल तरी बेहत्तर असा इशाराही देवाभाऊ गायकवाड यांनी या निवेदनात दिला आहे.

error: Content is protected !!