तळेगाव स्टेशन :
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या मावळ तालुका
अध्यक्षपदी माळवाडीचे उपसरपंच सुनील भोंगाडे यांची निवड करण्यातआली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सरपंच परिषदेचे संस्थापकअध्यक्ष जयंतराव पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या हस्ते भोंगाडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सुनील भोंगाडे हे राष्ट्रवादीचे
निष्ठावंत कार्यकर्ते असून राष्ट्रवादी युवकचे तालुका कार्याध्यक्ष व माळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून ते कार्यरत आहेत.या शिवाय रोटरी क्लब सह अन्य संस्थाशी ते निगडित आहे.ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेबद्दल त्यांना आस्था असून अनेक शाळा महाविद्यालयांच्या मदतीचा त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

error: Content is protected !!