तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्यातील कुंडमळयात पर्यटनाला आलेल्या पर्यटकांचा पाय घसरून पडल्याने नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला. नागरिकांनी धाव घेऊन वाहत जाणार्‍या एका दहा वर्षीय बालकाला वाचवले.सोमवारी (दि.२८ जुन)ला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह मिळून आला असून दुसर्‍याचा शोध सुरू आहे.
मोशी व देहूरोड परिसरातील हे नागरिक आहेत. आज दुपारी ते कुंडमळा याठिकाणी कुटुंबीयांसह पर्यटनासाठी आले होते. यावेळी दहा वर्षीय अरुष नरावडे व वैष्णव भोसले हे पाण्याच्या प्रवाहाशेजारी फोटो काढत असताना, पाय घसरून तोल गेल्याने ते दोघे पाण्यात पडले.
त्यांना वाचविण्यासाठी राकेश नरावडे यांनी देखील पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते सर्वजण वाहून जाऊ लागले. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करून आरुष ला पाण्यातून बाहेर काढले मात्र भोसले व राकेश नरावडे प्रवाहात वाहून गेले. यापैकी भोसले यांचा मृतदेह मिळून आला असून नरावडे यांचा शोध अद्याप सुरू आहे.
पर्यटनस्थळ बंदी असताना देखील पर्यटक पोलीसांना चकवा देऊन नदी ,डोंगर, धबधबे,पाण्याचे बंधारे वर जाऊन वर्षा विहाराचा आनंद घेत आहे. धोकादायक ठिकाणी जाऊन अशा दुर्देवी घटना जीवाला चटका लावून जाण-या आहेत. कुंडमळयावर यापुर्वी अशा काही घटना झाल्या आहेत,जिथून पर्यटक वाहून गेले आहेत.

error: Content is protected !!