वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात अनेक कातकरी वस्त्या आहेत. या कोरोणाच्या महामारीत अनेकांचा रोजगार गेला, उद्योगधंदे बंद पडले परंतु ज्या बांधवांचे हातावर पोट आहे अश्या कातकरी बांधवांवर उपास मारीची वेळ आली. काबाड कष्ट करुन जगणारा हा कातकरी समाज नेहमीच उपेक्षीत राहत राहीला. ना हक्काच घर, ना हक्काची जागा. शासनाच्या विविध योजना यांच्या पर्यंत पोहचे पर्यंत गाव गुंड त्याच्या वर ताबा मारुन मोकळे व्हायचे. त्या मुळे विट भट्यांवर, शेतांवर,मोल मजुरी करन हेच त्यांच्या नशीबी येवु लागल. मुलांच्या शिक्षणाकडे, स्वताच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे हे त्यांना कधी समजलच नाही. त्यात कोरोणा सारख्या महामारीने देशाची अर्थ व्यवस्था खिळ- खिळी केली तर या बाधंवाची अवस्थेच्या बाबतीत विचार न केलेच बरे. उद्वस्थ झालेले संसार, उपास मारीची वेळ या वेळेत विश्व हिंदु परिषद बजरंगदल व जनजाती कल्याण आश्रमाची मदत या बांधवांना खुप सुखावुन गेली.मावळ तालुक्यातील 15 वाड्या वस्त्यांवर जावुन 547 कातकरी कुटुंबांना शिधा किट वाटप करण्यात आले. हे शिधा किट वाटत असताना त्या वाडी वस्तीवर कातकरी बांधवाना सोबत घेवुन वृक्षा रोपण करण्यात आले. वृक्षांच महत्व पटवुन देवुन त्या वृक्षांच संगोपण करण्याच आश्वासन त्या कातकरी बांधवांनी दिले. हे शिधा किट देण्या साठी भर पावसाची तमा न बाळगता, चिखल तुडवत, शेताच्या बांधावरुन, रानावनातील वसत्यांवर जावुन शिधा किट देण्यात आले. त्या वेळी त्या माता भगीनींच्या चेहर्यावरील आनंद पाहण्या सारखा होता. चिमुखल्यांची लगबग, त्यांचा उत्साह खुप आनंददायी होता. तर वृक्षा रोपण करताना तरुण बांधव मोठ्या आत्मीयतेने, तत्परतेने वृक्ष लागवडीत सहकार्य करत होते. त्या प्रत्येक ठिकाणी जणु काही आनंदाची लगबग सुरु होती अस प्रसन्न वातावरण निर्माण झाल होते.विश्व हिंदु परिषद बजरंग दल व जनजाती कल्याण आश्रम देश भर मोठ्या प्रमाणावर गावो गावी, खेडो पाडी,आदिवासी वसत्यांवर जावुन आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करुन सेवा देण्याच काम करत असते. त्याच पद्धतीने मावळ तालुक्यातही शिधा किट वाटप, वृक्ष लागवड, गड किल्ले संवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गोरक्षण, जनजाती दिवाळी असे अनेक उपक्रम दरवर्षी राबवत असते.या वेळी नाणे मावळ मधील नाणोली, करंजगाव, उकसान, भाजगाव, सोमवडी, उंबरवाडी, मानकटवाडी, खांडशी, बुधवडी, अहिरवडे अश्या 15 वाड्या वसत्यांवर शिधा किट वाटप व वृक्ष लागवड करण्यात आली या ठिकाणी विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा सह संयोजक बाळासाहेब खांडभोर, तालुका संयोजक महेंद्र असवले, तानाजी असवले, प्रा. गोपिचंद कचरे, भास्कर गोलीया, सुर्याजी साठे, रघुनाथ आंद्रे, अतुल पर्हाड, राम घाटपांडे, व त्या गावातील ग्रामस्त व कातकरी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!