
लोणावळा(नवनाथ आढाव): लिबायत पोलीस कोठडीतून फरार असलेला आरोपी तेजा प्रकाश शिंदे पारधी वय २८ हा लोणावळा येथे आल्याची माहीती मिळाताच उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा मा. श्री. ए. एस.पी. नवनीत कुमार कावत साहेब व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. टी. वाय. मुजावर याच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, यांच्या टीम ने व गुजरात पोलीसानी सापळा रचून त्याला अटक केली. आरोपी ने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने किरकोळ जखमी झाले आहे.


