वडगाव मावळ:
रोटरी क्लबच्या वतीने इ लर्निग प्रोजेक्टरचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने मावळ तालुक्यातील १३ शाळांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि रोटरी क्लब ऑफ लोणावळा या क्लबच्या वतीने इ लर्निग प्रोजेक्टर देण्यात आले.
या प्रोजेक्टर च्या माध्यमातून पहिली ली ते दहावी पर्यंतच्या मराठी,सेमी इंग्रजी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी लाभ होणार आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल दांडेकर अध्यक्ष रोटरी क्लब तळेगाव दाभाडे, राजेश गायकवाड अध्यक्ष रोटरी क्लब लोणावळा यांनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेतले.
प्रोजेक्टसाठी प्रकल्प प्रमुख भालचंद्र लेले यांनी वाटपाचा आराखडा तयार केला. विकास तारे, अनिश होले, रविंद्र कुलकर्णी, खेमसिंह चौहान, आनंद आस्वले आदी रोटेरियन्सनी विशेष सहकार्य केले. कै.बा.न राजसंस विद्यालय परंदवडी व गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय करंजगाव या माध्यमिक शाळेत या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गोल्डन ग्लेड्स विद्यालयात रोटेरीयन्स पदाधीकार्यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. या वेळी रोटरीयन्स उपस्थितीत होते.

error: Content is protected !!