
वडगाव मावळ:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,डॉ. डी .वाय .पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि वनपरिक्षेत्र वडगाव मावळ विभागाच्या वतीने कातवी येथे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंन्सचे पालन करुन वृक्षारोपण केले .
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कातवीतील वनविभागाच्या जागेवर ३१० बांबु,बेहडा,आंबा,जांभुळ अशा विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावर्षी प्रथमच ३०० सिडबॉलचेही बिजारोपण कराण्यात आले.सिडबॉलची मदत आस्था संस्थेचे संस्थापक पराग कुंकूहोळ यांनी केली.
प्रत्येक सभासदाला २० वृक्ष लावण्याचे उदिष्ट दिले होते ते प्रत्येकाने आज पुर्ण केले संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी किमान १०००० वृक्ष लागवटीचे लक्ष ठेवले जाते. आतापर्यंत ६५० वृक्षलागवट करण्यात आली.
या उपक्रमात २० सभासद बंधू-भगिनींनी सहकुटुंब सहभागी झाले होते.प्रत्येक सभासदाचे सकाळी निघण्यापुर्वी टेंपरेचर चेक केले.शक्य तेवढे सोशल डिस्टंस चे पालन करुन ऊन आणि पावसाच्या खेळात वृक्ष लागवड करण्यात आली.
सोमनाथ ताकवले वनपरिक्षेत्र अधिकारी मावळ,श्री.डि एम ढेंबरे वनपरिमंडळ अधिकारी वडगाव, श्रीमती ए एस मुंढे वनरक्षक,श्री के जी जांभुळकर वनरक्षक,श्री एस एम भुंडे वनसेवक,डॉ मोहन गायकवाड अध्यक्ष संस्कार प्रतिष्ठान,श्रीमती रंजना जोशी उपाध्यक्षा,मनोहर कड,विजय आगम,मनिषा आगम,कैलास पेरकर,शैलजा पेरकर,दत्तात्रय देवकर,रमेश सरदेसाई,शिवकुमार बायस,डॉ सुभाष चाटे शुभम केकाण,अभिजित ठाणगे,प्रतिक्षा आर्डे,संकेत आगम,कोविद बेडेकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


