
तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहर युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी शुभांगी शिंदे यांची निवड करण्यात आली.क्रिडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले .पुणे जिल्हाध्यक्ष सीमा सावंत यांनी त्यांची निवड केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, सचिन हाके आदि मान्यवर उपस्थित होते.
शुभांगी शिंदे म्हणाल्या,’ पक्षवाढीसाठी सर्व प्रयत्न करेल. काँग्रेसच्या सर्व योजना शहरातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.
