
तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीमंत सरदार संध्या राजे दाभाडे सरकार यांची निवड करण्यात आली. राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पुणे जिल्हाध्यक्ष सीमा सावंत यांनी त्यांची निवड केली.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, जिल्हा खजिनदार महेशब ढमढेरे, संग्राम मोहोळ, सचिन हाके आदि मान्यवर उपस्थित होते .
संध्या राजे दाभाडे म्हणाल्या,” आमचे घराणे पूर्वीपासून काँग्रेस विचाराचे आहेत . श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या .अजित सिंह राजे दाभाडे नगराध्यक्ष होते. आम्हाला पूर्वीपासून राजकीय वारसा आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व काँग्रेसच्या सर्व योजना तळागाळातील लोकांना पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
काँग्रेसची विचारधारा ही प्रत्येक महिलेपर्यंत कशी पोचवता येईल यासाठी प्रयत्न करू महिलांना सुद्धा पन्नास टक्के आरक्षण आहे. महिलांनी सुद्धा पुढे येऊन समाज हिताचे काम केले पाहिजे.
