पवनानगर : येळसे येथे गरजूंना धान्याचे किट तर जेष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले
दिलीप दादा राक्षे युवा मंचाच्या वतीने येळसे येथे गरजूंना अन्नधान्य किट व जेष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले यावेळी येळेसे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व ग्रामस्थांच्या वतीने दिलीप दादा राक्षे यांचा सन्मान करण्यात आला तर येळचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय ठाकर यांची नुकतीच महागाव चांदखेड गट जेष्ठ नागरिक सेलच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा दिलीप दादा राक्षे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी सरपंच विजयराव ठाकर,तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा ठाकर, जेष्ठ नागरिक राष्ट्रवादी सेल अध्यक्ष पांडुरंग कडु
माजी सरपंच गोविंद ठाकर
माजी चेअरमन काशिनाथ कडु
माजी चेअरमन सुभाष कडु
नितीन वाघमारे सर,पत्रकार सचिन ठाकर,हभप मारुती ठाकर
सामाजिक कार्यकर्ते भाऊ ठाकर, मारुती कालेकर,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रमोद ठाकर,उद्योजक अमित ठाकर, बबन सुतार,संदिप ठाकर,सुरज ठाकर,लहु ठाकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन वाघमारे म्हणाले की, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व शेतीपूरक व्यावसायातून एक तरुण आणि समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या व अडचणी ओळखून त्या सोडवून न्याय देण्याचे काम दिलीप राक्षे यांनी हातात घेतले आहे आगामी काळात हेच नागरिक व ग्रामस्थ त्यांच्या कार्यासाठी धावून येतील
यावेळी बोलताना दिलापदादा राक्षे म्हणाले की, मागील दिड ते दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे याकाळात अनेकांचा रोजगार गेला तर काहींना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या याकाळात माझ्या जिवाभावाच्या मानसांना छोटीशी मदत म्हणून धान्याचे किट वाटप करण्यात येत तर जेष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप करण्यात आली आहे पुढील विविध उपक्रम राबवून तुमची सेवा करत राहिल
आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहवे व नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागणे गरजेचे आहे पवनमावळात गावांसाठी चालणे स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे लवकरच या स्पर्धेचे नियम व अटी आपल्यापर्यंत पोहचविणार आहोत यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी सरपंच राजेश वाघोले यांनी केले
कार्यक्रमचे आयोजन माजी सरपंच राजेश वाघोले अमित ठाकर,राहुल मोहोळ, दत्ता खिलारे, शक्ती कालेकर,सूरज कडु, आमिर तांबोळी,गोपी कालेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद ठाकर यांनी केले तर आभार पत्रकार सचिन ठाकर यांनी मानले

error: Content is protected !!