
तळेगाव दाभाडे : मुख्याध्यापक हा शाळेचा केंद्रबिंदू असतो त्याप्रमाणे कार्यकुशल नेतृत्व व कुशल प्रशासक म्हणून दशरथ ढमढेरे यांनी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळली असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथील मुख्याध्यापक श्री दशरथ ढमढेरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी संतोष खांडगे अध्यक्षस्थानी होते
पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी सेवानिवृत्ती हा पूर्णविराम राहू शकत नाही कारण शिक्षण क्षेत्र हे सेवाव्रत आहे ज्याप्रमाणे मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो त्याप्रमाणे गुरुचे स्थानही जीवनात आजन्म श्रेष्ठ असते
यावेळी बोलताना मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे म्हणाले की, माझ्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील सेवेमध्ये शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक या विविध पदावर काम केले या कार्यकालात मी माझ्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम केले भविष्यातही शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यकता असल्यास मी कायम योगदान देण्याचा प्रयत्न केला जाईल.
दशरथ ढमढेरे सर यांनी शिक्षण क्षेत्रात ३३वर्ष १० महिने एवढी सेवा केली याच कालखंडात त्यांना मावळ तालुका पंचायत समितीचे दोन वेळा गुणवंत अध्यापक म्हणुन कार्यगौरव करण्यात आले त्यांनी पवना विद्या मंदिर पवनानगर या दुर्गम भागातील शाळेमध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली या कार्यकालात इंग्रजी विषयाचे अध्यापन करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याच्या भाषेत इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांना या विषयाची आवड निर्माण केली त्यांनतर श्री एकविरा विद्या मंदिर, कार्ला त्यानंतर प्रगती विद्या मंदिर इंदोरी या शाळेत बदली झाल्यानंतर पर्यवेक्षक व त्याच शाळेत मुख्याध्यापक पदावर वर्णी लागली याच काळात इंदोरी शाळेला संस्थेचा लोकमान्य टिळक आदर्श शाळा पुरस्कार, जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार त्याचबरोबर त्याचकाळात शाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली व त्यादरम्यान ह. भ. प. आनंदराव काशिद पाटील ज्युनिअर कॉलेज सुरु करण्यात आले प्रत्येक वर्षी इयत्ता १०ची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले त्यानंतर पवना विद्या मंदिर पवनानगर येथे प्राचार्या पदी निवड करण्यात आली त्यांच्याच काळात पवना शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्याने शाळेचा भव्यदिव्य सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न झाले.
अशा अनेक भूमिका पार पाडल्यानंतर परांजपे शाळेत ते सेवा निवृत्त झाले
या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी परांजपे शाळेचे पर्यवेक्षक पांडुरंग कापरे, मावळ तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष संजय कसाबी, माजी अध्यक्ष मधुकर गुरव, पांडुरंग शिंदे, किरण गवारे,मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक विनोद भोसले,समीर गाडे, संपत गोडे यांच्यासह संस्थेतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
त्यानंतर ढमढेरे सरांचा सत्कार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मावळचे कार्याध्यक्ष भारत काळे, मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे कार्यकारी संचालक राम कदमबांडे, पवना शाळेचे जेष्ठ लिपिक प्रदीप ढोंगे, कनिष्ठ लिपिक दिनेश काळे, मनोज गराडे, शिक्षकेतर प्रतिनिधी मंगेश कदम, संतोष ठाकर, कलाअध्यापक अमोल जाधव, गणेश आबणावे याच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळेकामशेत:राज्यांच्या सत्तांतरानंतर मावळ तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच होण्याचा मान चिखलसे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मधुकर काजळे यांना मिळाला आहे.माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हा विजय खेचून आणण्यात भाजपा यशस्वी झाल्याचा दावा मावळ तालुका भाजपाने केला आहे. चिखलसे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत भाजपने बाजी मारल्याने भाजपाने आनंदोत्सव केला.चिखलसे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे […]
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणारदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणारतळेगाव स्टेशन:अनेक वर्षांपासून दुर्गम व खेडोपाडी भागातील विदयार्थ्यांची प्रवासा दरम्यान खुप मोठी गैरसोय होत आहे. एस.टी. बस वेळेवरती न येणे व काही ठिकाणी एसटीची सुविधाच नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची खुप मोठया प्रमाणावरती गैरसोय होत आहे.परिणामी विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरती खुप मोठा परिणाम होत आहे.दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना अर्ध्यावरती शिक्षण […]
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबाए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबामुंबई:प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेने ए.सी.लोकल चालू केल्या रेल्वे प्रशासन हळू हळू या लोकलची संख्या वाढवत आहे. या बद्दल यांचे स्वागत आहे. परंतू जस जशी ए.सी.लोकलची संख्या वाढत जाणार तसं तसं डबेवाला कामगारांना त्याचा फटका बसत जाणार आहे.कारण ए.सी. लोकलला लगेज डबा नाही.जर पिक अवर्स मध्ये या लोकलची संख्या वाढवली तर त्याचा […]
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरामामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरातळेगाव स्टेशन:मामासाहेब खांडगे स्कूलच्या प्रांगणात भोंडला व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दांडिया उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. इ. १ ली ते १० वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दुर्गापूजनाने व भोंडल्याने झाली.सर्व विद्यार्थ्यांनी भोंडल्याच्या गाण्यावर पारंपरिक पद्धतीने फेर धरला होता. सौ. प्रगती काळे यांनी […]
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडेवडगाव मावळ :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शेतकरीहित आणी कल्याणकारी योजना बॅंक कर्मचाऱ्यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी केले. वडगाव मावळ येथे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल विजय माधवराव टापरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यावेळी दाभाडे हे बोलत होते.यावेळी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी […]


