

पवनानगर :
पवनमावळाच्या पूर्व भागातील महिलांसाठी दिलीप पोपटराव राक्षे यांच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण क्लासेस सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी बळकटी मिळणार आहे.
मावळ तालुक्यातील महिला व मुलींना आपल्या पायावर उभे राहता यावे.आपल्या कुटुंबाला हातभार लावता यावा. कुटूबांचा उदरनिर्वाह करता यावा, महिलांना आपल्या पायावर कसे उभे करता येईल यासाठी दिलीप राक्षे हे कायम प्रयत्नशील असतात.त्यासाठी पवनमावळाच्या पूर्व भागातील अनेक गावातील महिलांसाठी मोफत शिवण क्लासेस सुरू करण्यात आले.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत यांच्या हस्ते आज या क्लासेसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संत साहित्याच्या अभ्यासिका युवा महिला किर्तनकार जयश्रीताई येवले,सुनिता मनोज येवले, उपसरपंच आढले, अश्विनी सपकाळ, संध्या गायकवाड अश्विन सुभाष येवले,अश्विनीताई येवले,अश्विनी शिंदे दामिनी टेकळे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी मावळ तालुका वतीने आणि दिलीपदादा राक्ष मित्र परिवाराच्या वतीने सर्व महिलांचा वटपौर्णिमे निमित्त सन्मान करण्यात आला.
मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत म्हणाल्या , “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आग्रही राहिला आहे,पक्ष पातळीवर यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे.महिलां सक्षमीकरणासाठी आवश्यक असणारे अनेक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राबवले आहे,त्यात भर म्हणून दिलीपभाऊ घेत असलेला हा स्तुत्य उपक्रम आहे,ज्याचा लाभ अनेक महिला भगिनींना होईल.
मावळ तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आपण पाहत आहोत. याचाच भाग दिलीप दादा राक्षे युवा मंच यांच्या वतीने पवनमावळतील महिलांसाठी मोफत शिवण क्लासेस सुरु करण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांना घरबसल्या आर्थिक उत्पन्न मिळणार आहे .त्यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी मदत होणार आहे.
बोलताना दिलीप राक्षे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा पहिला प्रयत्न आहे .पुढील काही दिवसात पवन मावळातील मध्यवर्ती भागात असलेल्या गावामध्ये असे मोफत शिवण क्लासेस सुरु करण्यात येणार आहे .त्यामुळे महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे.
यावेळी अश्विनी मनोज येवले म्हणाल्या की ,”दिलीप राक्षे यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये महिला सक्षमीकरण हा सर्वात उत्तम उपक्रम आहे. यासाठी या परिसरातील सर्व युवती महिला व महिलांना सहभागी करून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जातील.जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कुटूंबाला मदत करता येईल.
या कार्यक्रमाचे आयोजन दिलीप पोपटराव राक्षे युवा मंचाच्या वतीने आदर्श सरपंच राजेश वाघोले, अमित ठाकर, राहूल मोहोळ, माऊली पशाले, शक्ती कालेकर यांच्या वतीने करण्यात आले होते.
सुत्रसंचलन आप्पासाहेब देशमुख यांनी केले. तर आभार उपसरपंच अश्विनी सपकाळ यांनी केले.


