कामशेत:
पावसाळा सुरु आहे .. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात..नकळत दूषित पाणी प्यायलं जातं. त्यामुळे जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, जंतूची वाढ या आजाराला सामोरे जावं लागत. त्यामुळे पावसाळ्यात शुद्ध पाणी पिणं हा वरील सर्वोत्तम उपाय आहे.पिण्याचे पाणी उकळून प्या असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा यांनी केले आहे.
दूषित पाणी पिल्याने उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. र दूषित पाणी झाल्याने गॅस्ट्रो होतो. शरीरातील पाणी कमी झाल्यावर सलाइन लावण्याची वेळ येते.
दूषित पाणी पिल्याने शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर जुलाब सुरु होतात. पोटात खूप दुखतं, कळ मारत. ताप येतो. त्यामुळे अॅन्टीबायोटिक्स देऊन रुग्णाला बरं करावं लागत.
दूषित पाण्यामुळे कावीळ होते,हेपेटायटिस ‘ए’ किंवा ‘इ’ हे प्रकार झाल्याचं आढळतात. हा आजार दूषित पाण्यातून होतो यावर विश्वास बसत नसला तरी ते सत्य आहे. दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसात उलट्या, ताप, लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणं ही लक्षणं दिसतात.
चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिन्यात हा आजाराची लक्षणं कायम राहतात. ९० ते ९५ टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. टायफॉईड हा दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते,अशी लक्षणे असलेले आजार दूषित पाण्याने होतात याकडे लक्ष वेधून डाॅ. विकेश मुथा यांनी शुद्ध पाणी प्या असा सल्ला दिला आहे.
डाॅ. विकेश मुथा म्हणाले,”
पाणी उकळून प्यावं. मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावं. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणं टाळावं. पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत पित राहावं.

error: Content is protected !!