पवनानगर:
शासकीय योजनेतील सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना सर्व लाभार्थ्यां पर्यंत पोहचल्याचे वेगळे समाधान आणि आनंद होत असल्याचे प्रतिपादन मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती शेष फंडातून माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर व जिजाबाई पोटफोडे यांच्या निधीतून तीस लाभार्थ्यांना पीठ गिरणी व पिकोफाॅल मशीनचे वाटप येथील शिवप्रसाद मंगल कार्यालय येथे करण्यात आले यावेळी म्हाळस्कर बोलत होते.
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर म्हणाले ,” पंचायत समिती कडून विविध लाभाच्या वैयक्तिक योजना ज्या वेळी ख-या अर्थाने लाभार्थी पर्यंत पोचतात त्या वेळी त्या वेळी मनाला खरा आनंद होत असतो. समाजातील गरजू लोकांना योजना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीच्या माध्यमातून लाभ करून घ्यावा.
माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे, संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक पांडूरंग ठाकर, कडधे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुसुम केदारी, किसन गावडे, एकनाथ पोटफोडे, ग्रामसेविका प्रतिभा कुंभार ,संजय केदारी थुगांव चे माजी सरपंच भाऊ सावंत, ज्ञानेश्वर ठाकर,भारत काळे, नरहरी तुपे , बजिरंग तुपे, उपसरपंच कमल भरत तुपे, पुजा गोसावी, सयाजी यादव, कमल नरहरी तुपे, पार्वता गिरी उपस्थित होते.
आत्मीयतेने काम करणाऱ्या ग्रामसेविका प्रतिभा कुंभार यांच्या कामामुळेच या योजना खऱ्या अर्थाने गरजूंना मिळाल्या असे गौरवोद्गार माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी व्यक्त केले.
दळवी म्हणाले,” निस्वार्थी भावनेने जनतेची सेवा करण्याचे‌ काम मावळ तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते करत‌ आहेत .तर कार्यकर्त्यांनी जमिनीवर चालून योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ जाधव यांनी कले. आभार सरपंच कुसुम केदारी यांनी मानले.

error: Content is protected !!