वडगाव मावळ:
भारतीय जनता पार्टी मावळ यांच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त आज टाकवे बुद्रुक दत्त मंदिर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
ज्येष्ठ नेते अविनाश बवरे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी माजी उपसभापती शांताराम कदम ,गणेश कल्हटकर ,अमोल भोईरकर, ऋषींनाथ शिंदे,सचिन पांगारे, काळूराम घोजगे ,तुकाराम कोदरे ,रामदास चव्हाण,राघूदादा जाधव,विठ्ठल तुर्डे, संदेश शेलार ,सागर यादव आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत अमोल भोईरकर यांनी केले.सोपान असवले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!