
कामशेत,ता.२३:
दरवर्षी आषाढी यात्रेला पंढरपूरची नियमित वारी करणा-या अडीचशे वारक-यांना महावीर हाॅस्पिटल च्या वतीने मोफत हेल्थकार्डचे वाटप करण्यात आले. या वारकरी बांधवाना महावीर हाॅस्पिटल येथे मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे..
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा व खडकाळा ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा या मुथा दांपत्याच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळ सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार यांच्या कडे ही हेल्थ कार्डे सुपूर्त केली असून वडगाव मावळ येथे पोटोबा महाराज मंदिरात होणाऱ्या पोटोबा देवस्थान व वारकरी मंडळ सेवा समितीच्या कार्यक्रमात वारक-यांकडे हे कार्डे देण्यात येणार असल्याचे संतोष कुंभार यांनी सांगितले.
यावेळी
मावळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा कुंभार,
शिवसनेचे माजी शहरप्रमुख गणेश भोकरे,कैलाश परमार,मकरंद कुंभार उपस्थित होते.
प्रत्येकी वर्षी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात महावीर हाॅस्पिटल तर्फे वारीत वारक-यांची आरोग्य सेवा केली जाते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीचा भव्य पालखी सोहळा होणार नसला तरी,मनोभावे श्री विठ्ठलाची भक्ती करणा-या वारी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे महावीर हाॅस्पिटलचे डाॅ. विकेश मुथा यांनी सांगितले.

