टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील फळणे फाटा भोयरे रस्त्याच्या साईट पट्ट्यांचे काम चालू आहे. हे काम चालू असताना रस्त्याच्या कडेला कुठेही दिशादर्शक किंवा काम चालू आहे असे कुडेही सूचना फलक लावलेले नाहीत. आंदर मावळ मधील रस्ते खुप अरुंद असल्यामुळे समोरील गाडीला साईड देण्याच्या उद्देशाने दुसरी गाडी रस्त्याच्या खाली जात आहे.
त्यामध्ये आज सकाळी असाच एक प्रकार झाला सुदैवाने यामध्ये गाडी पलटी होऊन जीवित हानी झाली नाही. संबंधित ठेकेदार कामांमध्ये अति नफ्याच्या दृष्टीने कूचराई करू पाहत आहे. संबंधित ठेकेदाराला या समस्येविषयी स्थानिक नागरिकांनी बऱ्याच वेळा तक्रारी करून सुद्धा याकडे लक्ष देत नाही. अशी माहिती स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष आंदर मावळ उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांनी दिली आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ येथील कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी येऊन ऑडिट करत नाही किंवा पाहाणी करत नाही त्यामुळे होणाऱ्या कामाकडे शासकीय यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. संबंधित कामाची येऊन चौकशी करावी अशी मागणी माजी उपसरपंच रोहिदास असवले, साहेबराव आंबेकर,रोहिदास जांभूळकर, संदीप मालपोटे, ज्ञानेश्वर ढोरे,अनिल जाधव,अतिश मोरे यांनी केली आहे.

error: Content is protected !!