वडगाव मावळ:
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मावळ तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्व कमिटीतील पदाधिकाऱ्यांची बैठक काल वैष्णव सदन, कामशेट येथे संपन्न झाली. यावेळी नियोजित कार्यक्रम मावळ तालुक्यातील पस्तीस दिंडयांमधिल गरीब -गरजु वारकऱ्यांना आषाढी वारी निमित्ताने अन्नधान्याचे किट देऊन सन्मानित करणे यावर चर्चा झाली.
यासाठी लागणार्‍या वस्तू स्वेच्छेने देण्यात याव्यात. कोणत्याही प्रकारचे बंधन आणि जबरदस्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी बर्‍याच प्रमाणात वस्तू गोळा झाल्या. त्यामध्ये गहू, तांदुळ, तेल, ह.डाळ , मसुरडाळ, मसाले, हळद,गुळ आणि अंगाचे व कपड्याचे साबण गोळा झाले.तसेच यासाठी कोणी सढळ हाताने मदत करू इच्छित असल्यास ती स्विकारण्याचे ठरले. तर जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी यात सहभागी व्हावे. असे अवाहन करण्यात आले. मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून त्यावर चर्चा झाली. यासाठी पुणे जिल्हा वारकरी सेवा समितीचे प्रमुख संतोषभाऊ कुंभार आणि पुणे जिल्हा आरोग्य समिती प्रमुख डाॅ.विकेशजी मुथा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर , सहसचिव दिनकर निंबळे, कोषाध्यक्ष भरतजी वरघडे गुरुजी, विजय महाराज गाडे, दत्तोबा भोते, तालुका अध्यक्ष दत्ता महाराज शिंदे, तालुका कोषाध्यक्ष तुकाराम महाराज भांगरे पाटील, राजारामजी असवले महाराज, सचिनभाऊ ठाकर, लक्ष्मण तळावडे, आत्माराम शिंदे, शंकर बोंबले, अनुसयाबाई म्हस्के, छायाताई काकरे, दत्तात्रय गरूड, शांताराम महाराज जगताप, शंकरमहाराज ढोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मिटींग संपल्यानंतर आलेले धान्य व वस्तू पॅकिंग करण्यात आले. किट वाटपाचा कार्यक्रम रविवार दिनांक २७ रोजी वडगाव येथे पोटोबा महाराज मंदिरात संपन्न होणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येईल व तशा सूचना नंतर दिल्या जातील.

error: Content is protected !!