टाकवे बुद्रुक :
येथे दत्तमंदिरामध्ये योग साधना करण्यात आली. मन शांत करून आत्म्याशी एकरूप होणे म्हणजे योगा मानसिक विकार, ऑक्सिजन लेवल, शारीरिक सुदृढता ह्या सर्व गोष्टी वाढवण्यासाठी योग खूप महत्त्वाचा आहे.
२१जूनभारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो.
शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला.
आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन केले जात आहे.आज जागतिक योगा दिवस त्या निमित्ताने टाकावे ब्रु येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने योग दिवस साजरा करण्यात आला. मावळ तालुका योग प्रशिक्षक संतोष जांभूळकर यांनी याठिकाणी योगाची प्रत्याक्षिके यांनी करून दाखविले.
तसेच योग साधनेचे महत्व पटून दिले. त्या निमित्ताने मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम ,आंदर मावळ अध्यक्ष गणेश कल्हटकर,माजी उपसरपंच रोहिदास असवले, साहेबराव आंबेकर,अमोल भोईरकर,काळूराम घोजगे,विकास असवले, स्वप्निल असवले, ऋषींनाथ शिंदे ,सचिन कदम,अमोल आगीवले ,सुधीर भोईरकर ,समीर भोईरकर आदी मान्यवर उपस्थित होते सोपान असवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!