
कामशेत:
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदी पै संकेत राणे, कामशेत शहर विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी पै सुरज पुरी तर कामशेत शहर राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्ष पदी श्री. अमोल काळे यांची नव्याने निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष श्री बबनराव भेगडे
पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री विठ्लराव शिंदे, मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष श्री नवनाथ चोपडे यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री नारायणराव ठाकर, आंदर मावळ विद्यार्थी अध्यक्ष वैभव पिंगळे, सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष श्री मंगेश मारुती जाधव, प्रसाद चोपडे उपस्थित होते.


