
वडगाव मावळ:
आंदर मावळ मधील फळणे फाटा ते भोयरे रस्त्यावरील आवडेवाडीच्या आसपास भला मोठा खड्डा पडला होता, या रस्त्याच्या मधून पाईपलाईन नेल्यामुळे याठिकाणी लांबलचक खोल खडा पडला होता, या खड्ड्यामुळे रस्त्याने येणाऱ्या फोरविलर गाड्या पूर्णपणे पुढचा मागच्या भागाने घासत असल्यामुळे गाड्यांचे नुकसान होते.
तसेच रात्रीच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे गाड्या खड्ड्यामध्ये आपटून गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटत होते,यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. आंदर मावळ मध्ये जाणार्या येणार्या पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना व इतर व्यावसायिकांना त्या खड्ड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता त्या गोष्टीची दखल घेत.
त्या ठिकाणी टाकवे गावचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सचिन वसंतराव मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून त्या ठिकाणी खडा बुजविण्यात आला आहे.या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी त्यांचे अभिनंदन व सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांनी कान्हे फाटा ते टाकवे या भागातील डागडुजीचे काम करावे रस्त्यामधील पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे व स्थानिक नागरिकांनी केली आहे.


