सोमाटणे:
शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते याचा विचार करून पिकांची निवड केली तर निश्चितच बळीराजाच्या हातात जास्तीचे चार पैसे मिळतील. अधिक उत्पन्नासाठी दारूंब्रे येथील बाळू पांडुरंग वाघोले या शेतक-यांनी शेतात काकडी आणि कोथिंबीर लावली आहे.
काळया भोर जमिनीत काकडी जोमाने वाढली आहे. सरी पद्धतीने लागवड केल्या काकडी तेजीत असून दमदार पिक बहाण्याची त्यांना अपेक्षा आहे. शेतीच्या या वावरात छबाबाई बाळू वाघोले,जनार्दन बाळू वाघोले राबवून कष्टाने शेती फुलवित आहे.
बाजारात काकडीला मोठी मागणी आहे. काकडीची ही मागणी का आहे हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल. काकडी आरोग्यवर्धक असल्याने तिला मोठी मागणी आहे.
उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये ८० टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.
काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात. काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.
काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते.
काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करणं
आणि मधुमेहातील काही कॉम्प्लिकेशन्स रोखण्यात
मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांनी काकडीच साल
नक्कीच खावी.
पोटाच्या समस्या किंवा कन्स्टीपॅशनची समस्या असेल तर तुम्ही रोजच्या आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे. तोंडाच्या दुर्गंधीची समस्या असेतर तोंडात एक काकडीचा तुकडा धरून ठेवा.काकडीच्या वासाने तोंडात दूर्गंधी निर्माण करणाऱ्याबॅक्टेरियापासून तुमची सुटका होते.
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन “बी’
असतं. ज्यामध्ये व्हिटॅमिन “बी-1′, व्हिटॅमिन-“बी-5′
व्हिटॅमिन “बी-7′ यांचे प्रमाण जास्त आहे. काकडीच्या वापराने डोळ्याखालील काळी वर्तुळलवकर कमी करता येतात. तसंच डोळ्यातील उष्णता शोषली जाते व डोळ्यांना थंडावा मिळतो. झोपून उठल्यावर डोळे सुजलेले असल्यासत्यावर काकडीच्या स्लाईस ठेवा किंवा काकडीचा रस लावा.काकडीचा कीस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा आणि त्वचा चमकदार बनते. चेहऱ्यावरचे डाग दूर होतात.
अशी बहुपयोगी काकडी बरोबर वाघोले शेतात आहारातील सुगरण असलेल्या कोथिंबीरची लागवड करीत असतात.

error: Content is protected !!