
टाकवे बुद्रुक:
शाळा बंद पण अभ्यास सुरू याअंतर्गत आंदर मावळ मधील शाळांना गटशिक्षण अधिकारी यांनी भेट दिली.
मावळ तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यातर्फे (दि. 18 वार शुक्रवार) आंदर मावळ मधील शाळांना भेट दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्याच्या निमित्ताने मावळ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी, व सर्व केंद्रप्रमुख,तसेच सर्व विषय तज्ञ यांच्यासमवेत उपस्थित होते.
आंदर मावळचे मुख्य ठिकाण टाकवे बुद्रुक येथील ओळखली जाणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे प्रथमता भेट देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच भूषण असवले व उपसरपंच सतू दगडे यांनी गटशिक्षणधिकारी बाळासाहेब राक्षे यांचा सत्कार केला.
सन 2021- 22 या नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्या परंतु कोरोणाचे संकट खूप गंभीर असल्यामुळे कोरोना काळातही शिक्षण चालू राहावे,शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नवचैतन्य निर्माण व्हावे जनजागृती व्हावी यासाठी हा दौरा पंचायत समितीच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे .
तसेच दुर्गम भागात असणार्या शाळा सटवाई वाडी,डोंगरवाडी या सारख्या अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देण्यात आल्या व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.100% पटनोंदणी करावी तसेच 100 % विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण पोचवणे.’ शाळा बंद पण अभ्यास सुरू ‘ याअंतर्गत शासनाच्या विविध ॲप कार्यक्रम या विषयी गटशिक्षण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जि.प. प्रा.शाळा टाकवे बु.व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत असवले व उपाध्यक्ष मनीषा मोढवे यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले.


