वडगाव मावळ:
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) मावळ तालुक्यातील विद्यार्थी, कामगार व प्रवासी नागरिकांकरिता आजपासून कात्रज ते वडगाव मावळ या नवीन मार्गावरील बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
तालुक्यातील नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पीएमपीएमएलकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होतो. प्रवाशांच्या सोयीसाठी कात्रज-वडगाव मावळ मार्गावर बससेवा सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे.
या नवीन बसमार्गामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्यास मदत होईल व याचा फायदा नक्कीच नागरिकांना होईल.यावेळी आमदार सुनिलआण्णा शेळके, जिल्हा परिषद सदस्य श्री.बाबुराव वायकर, पीएमपीएमएल निगडी डेपो आगार व्यवस्थापक श्री.शांताराम वाघेरे, बालेवाडी आगार व्यवस्थापक श्री.माळी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री.बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष श्री.सुभाष जाधव, कार्याध्यक्ष श्री.दिपक हुलावळे, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष श्री.मयूर ढोरे, संघटनमंत्री श्री.नारायण ठाकर, नगरसेवक श्री.सुनिल ढोरे, श्री.चंद्रजीत वाघमारे, श्री.पंढरीनाथ ढोरे उपस्थित होते.

error: Content is protected !!