
दिल्ली:
देशाचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. फ्लाइंग सिख म्हणून प्रसिद्ध ते जगभर प्रसिद्ध होते. मिल्खा सिंग यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून ते घरीही परतले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांचे कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनाने शोककळा पसरली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रीडाक्षेत्रातील कविता राऊत यांच्यासह अनेकांनी आपल्या दु:खद भावना व्यक्त केल्या. महान धावपटू मिल्खा सिग यांना मावळमित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.