
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक ‘ग्लोबल अप्रूवल लिडर’ आहेत.जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘Global Leader Approval ‘ म्हणून लोकप्रिय आहे.कोरोना काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम राहिलेली आहे.
अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म ‘मॉर्निंग कंसल्ट’ द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘Global Leader Approval ‘ म्हणून स्विकारलं आहे. जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वेक्षणात पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ग्लोबल अप्रूवल रेटिंग 66 टक्के आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, ब्रिटेन, रूस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह 13 देशातील इतर नेत्यांपेक्षा अव्वल ठरले आहेत.


