कामशेत:
मावळ तालुक्यातील महत्वपूर्ण बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरातील उड्डाणपुलास’ स्व. दिलीपभाऊ टाटिया यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रहाची मागणी वंचित बहुजन आघाडी, तालुका मावळ यांच्या वतीने करण्यात आली .
या संबंधीचे लेखी निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, खडकाळा ग्रामपंचायतिचे सरपंच रूपेश गायकवाड,ग्रामविकास अधिकारी जगजीवन मोढोरिया कामशेत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख रमेश ओव्हाळ, अनिकेत साळवे, किशोर ओव्हाळ, विलास वंजारे,अमित सूर्यवंशी, रुपेश सुतार, आमीर खान आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
कामशेत शहरासह मावळ तालुक्यातील सर्वागीण विकासात स्व.दिलीपभाऊ टाटिया यांचे मोठे योगदान आहे. स्व.दिलीपभाऊ यांच्या दृष्टीने मावळ तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी कामशेत शहराची ओळख आहे. तिन्ही मावळातील नागरिकांच्या संपर्काची सर्वात मोठया शहरात उभारलेल्या या उड्डाणपूलास टाटिया साहेबांच्या नाव द्यावे अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!