टाकवे बुद्रुक: आंदर मावळात बांधावर खत वाटप कार्यक्रम संपन्न झाला. मावळ तालुक्यातील आंदर मावळातील आठ गावे मिळून नाबार्ड अंतर्गत आंदर मावळ शेतकरी उत्पादक कंपनी , वडेश्वर ही मावळ तालुक्यातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. रूरल कम्युन्स मुंबई व कृषी विभाग यांच्या सहकार्याने एक वर्षा पूर्वी करण्यात आलेली आहे .
सध्या कोरोना या जागतिक महामारीमुळे शेतकऱयांनी कृषीसेवा केंद्रात गर्दी करू नये , अशा शासनाच्या सूचना असल्यामुळे आंदर शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणीकृत सभासदांना त्यांच्या मागणीनुसार खत देण्यात आले. आतापर्यंत २० टन युरिया व ७ टन १८:१८:१० या खतांचे वाटप करण्यात आले. खत घरपोहोच वाटपासाठी कंपनीचे अध्यक्ष तुकाराम नथु लष्करी , उपाध्यक्ष प्रकाश श्रीरंग घुडे, सचिव बबन शंकर खांडभोर व सर्व संचालकांनी पुढाकार घेतला.
यासाठी कृषी विभागाचे देवेंद्र ढगे तालुका कृषी अधिकारी मावळ ,विक्रम कुलकर्णी मंडळ कृषी अधिकारी , संताजी जाधव , घनश्याम दरेकर ,राहुल घोगरे व रूरल कम्युन्सचे प्रकल्प समन्वयक ओंकार कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!